उद्यापासून सुरु होणारे भारत-श्रीलंका टी-२० सामने ‘या’ चॅनेलवर लाईव्ह पाहता येणार
मुंबई : (India Vs Shri Lanka T-20 Serial 2023) नव्या वर्षाच्या सुरुवीतीलाच टी-20 मालिका खेळली जाणार असून, त्या पार्श्वभुमीवर श्रीलंकेचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. 2023 च्या पुर्वसंधेला भारताला विजयी सुरुवात करायची आहे. मंगळवार दि. 3 रोजी पासून या मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघाकडून विजयासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मात्र, हि मालिका कुठे पाहाता येणार हा अनेक क्रिकेटप्रेमींना पडलेला प्रश्न आहे.
भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली नव्या दमाच्या खेळाडूंना सोबत घेऊन मैदानात उतरणार आहे. दरम्यान, पहिलाच सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत पुन्हा एकदा पांड्यासह नवख्या खेळाडूंकडे मोठी जबाबदारी आली आहे. यावेळी भारताचा सामना आशिया कपमधील चॅम्पियन संघाशी होणार आहे, जो सध्या फॉर्मात आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल, नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल