IND vs SA : दुसरा टी-20 सामनाही ‘या’ कारणामुळे होणार रद्द

गकेबेरहा : (India vs South Africa 2nd T20) भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना गकेबेरहा शहरातील सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामन्यापूर्वीच क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक वार्ता समोर आली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उद्या गकेबेरहा शहरात पावसाची 60 टक्के शक्यता आहे. त्याचबरोबर गकेबेरहाचे तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. हा सामना दक्षिण आफ्रिकेच्या वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजल्यापासून खेळला जाईल.
पहिला टी-20 सामना पावसामुळे गेला होता वाहून
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना रद्द झाला. सततच्या पावसामुळे या सामन्यात नाणेफेक होऊ शकली नाही. अशा स्थितीत मालिकेतील उर्वरित दोन सामने दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
टी-20 मध्ये दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 24 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 13 वेळा विजय मिळवला असून 10 सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत. त्याचवेळी एक सामनाही अनिर्णित राहिला. दक्षिण आफ्रिकेतील टीम इंडियाचे आकडेही खूपच प्रभावी आहेत. दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघांमध्ये 7 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 5 टी-20 सामने जिंकले आहेत आणि फक्त 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.