ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मुख्यमंत्री शिंदेंनी तीन वाक्यात ‘तो’ विषय संपवला! राऊतांच्या दाव्यावर उत्तर देताना म्हणाले..

नागपूर : (Eknath Shinde on Sanjay Raut) महाविकास आघाडीच्या काळात एकनाथ शिंदेंनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार होते. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना विरोध दर्शवला. आम्ही एकनाथ शिंदेंच्या हाताखाली काम करणार नाही असं अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांनी सांगितलं होतं. असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याबाबत मुख्यमंत्री एका वाक्यात संजय राऊत यांच्या सगळ्या दाव्यातली हवाच काढून घेतली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
संजय राऊत यांच्या दाव्याविषयी जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले, “कोण संजय राऊत? शीतल म्हात्रेंना काही विचारायचं तर विचारा, मला जरा चांगले प्रश्न विचारा.” अशा तीन वाक्यांमध्ये संजय राऊत यांनी केलेला दावाच उडवून लावला आहे.

संजय राऊत यांनी काय म्हटलं होतं?
२०१४ मध्ये भाजपाने शिवसेनेची युती केली. त्यानंतर परत त्यांनी युती केली. तेव्हा आम्ही सरकारमध्ये होतो. २०१९ भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही. त्यांनी चर्चेचीही तयारी दर्शवली नाही. त्यामुळे भाजपासह सरकार स्थापन करण्याचा प्रश्न आला नाही कारण ते सरकार बनवण्याच्याच तयारीत नव्हते. उदय सामंत जे सांगत आहेत खोटं आहे. उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. उदय सामंत यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या आमचं सरकार आलं तर ते आमच्या दारात असतील पण आम्ही त्यांना सत्तेत घेणार नाही. एकनाथ शिंदेंना त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं असतं तर आज त्यांची भूमिका वेगळी असती. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये