क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

सिराजचा तांडव, अवघ्या 12 धावांमध्ये श्रीलंकेचा निम्मा संघा गारद, रचले अनेक विक्रम..

India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 : 19 दिवस चालणाऱ्या आशिया कप स्पर्धेतील 13वा आणि शेवटचा सामना आज भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जात आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मोहम्मद सिराजने सामन्याच्या चौथ्या षटकात लंकेची पार दैना उडवून दिली. त्याने चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निसंकाला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सदिरा समरविक्रमा आणि चौथ्या चेंडूवर असलंकाला बाद केले. सिराज आता हॅट्ट्रिक करणार असे वाटत होते. मात्र धनंजया डिसेल्वाने चौकार मारत सिराजची हॅट्ट्रिकची संधी हिरावून घेली.

मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सिराजने धनंजयाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जसप्रीत बुमराहने सामन्याच्या पहिल्याच षटकात श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्याने तिसऱ्या चेंडूूवर कुसल परेराला शुन्यावर बाद केले. सध्या लंकेची अवस्था 6 बाद 16 अशी केली.

भारताने सात वेळा तर श्रीलंकेने सहा वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. गेल्या वेळी भारताने 2018 मध्ये आशिया कप जिंकला होता आणि आता पाच वर्षांनंतर आठव्यांदा हे विजेतेपद जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये