रेल्वे तिकीट बुकिंग नियमात लक्षणीय बदल
![रेल्वे तिकीट बुकिंग नियमात लक्षणीय बदल indian railway](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2024/10/indian-railway-780x470.jpg)
रेल्वे प्रवासासाठी आगाऊ आरक्षण कालावधी (ARP) आता १२० दिवसांवरुन ६० दिवसांवर आणला आहे. या नवीन नियमांची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून होणार आहे. तसेच रेल्वे तिकीट बुकिंगच्या नवीन नियमांमुळे १ नोव्हेंबरपूर्वी केलेल्या बुकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. ३१ ऑक्टोबरपर्यंत केलेले सर्व बुकिंग नियमानुसार कायम असतील, असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
१६ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या रेल्वे बोर्डाच्या परिपत्रकात तिकीट बुकिंग बदलाचे विशिष्ट कारण दिलेले नाही. परंतु बुकिंग प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या भूमिकेवर जोर देण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे की, परदेशी पर्यटकांसाठी 365 दिवसांच्या रेल्वे तिकिट बुकिंगच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही. ज एक्सप्रेस, गोमती एक्सप्रेस सारख्या विशिष्ट दिवशी धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही, जेथे आगाऊ आरक्षणासाठी कमी वेळ मर्यादा आधीच पूर्वीपासूनच आहे.
तिकिटांच्या काळाबाजाराला बसणार आळा?
गाड्यांमधील आरक्षणाच्या नव्या नियमांचा रेल्वे प्रवाशांवर संमिश्र परिणाम होणार आहे. सध्या, रेल्वे तिकिटांसाठी आगाऊ आरक्षण विंडो १२० दिवस अगोदर उघडत असल्याने, प्रवासी तिकीट आधीच बुक करतात. मात्र काहींना अचानक प्रवासाची योजना बनवली होती त्यांना तिकीट मिळू शकत नव्हते. अशा परिस्थितीत या प्रवाशांना नवीन नियमाचा फायदा होणार आहे.तसेच नव्या नियमांमुळे तिकिटांच्या काळाबाजारालाही मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. तथापि, जास्त कालावधीमुळे, पूर्वी वेटिंग तिकिट असलेल्यांना त्यांचे तिकीट कन्फर्म होण्याच्या दृष्टीने फायदा मिळत असे. अधिक वेळाने, त्यांची तिकिटे कन्फर्म होण्याची शक्यता जास्त होती, आता नवीन नियमानुसार त्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
यापूर्वी २५ मार्च २०१५ रोजी रेल्वे तिकिट आरक्षण प्रवासा आधी १२० दिवस करण्याची सुविधा देण्यात आली होती. आता. प्रवाशांसाठी अधिक सुव्यवस्थित आणि व्यवस्थापित प्रणाली ऑफर करण्यासाठी रेल्वे बोर्ड आता 60 दिवसांच्या बुकिंग कालावधी करण्यात आला आहे.