पतीला दुसर्या महिलेसोबत शेअर करणे भारतीय महिलांना अमान्य

आपल्या पतीला इतर महिलेसोबत शेअर करणे किंवा आपल्यासोबत भागीदार बनविणे भारतीय महिलेला कधीही मान्य होणार नाही. त्यामुळे भारतीय दंड संहितेमधील कलम ४९७ ने व्यभिचाराला अपराधी ठरवले आहे, जो दुसर्या व्यक्तीच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवतो. या कृत्यासाठी जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षेची तरतूद देखील केली आहे.
अॅड. रमेश प्रकाश साळवी
पुणे जिल्हा व कौटुंबिक
नवी दिल्ली : भारतीय महिला आपल्या पतीबाबत अत्यंत संवेदनशील आणि मालकी हक्क दाखवणार्या असतात. त्यामुळे आपला पतीला इतर महिलांसोबत शेअर करणे हे त्या सहन करू शकत नाहीत, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम ठेवत याचिकाकर्ता सुशील कुमार आणि इतर सहा जणांची याचिका फेटाळून लावली.
पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तसेच पतीने आधीच दुसर्या महिलेशी लग्न केले होते. या लग्नातून त्याला दोन मुलेदेखील आहेत. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता तिच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर छळ करण्यात आला, असे सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले होते. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वाराणसी जिल्ह्यातील मदुआडीह पोलिस ठाण्यात आयपीसीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पती सुशील कुमारला अटक करण्यात आली होती. त्याने जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली होती. पण, न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. सत्र न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. पतीने २०१८ मध्ये तिसरे लग्न केले. पत्नीच्या आत्महत्येमागे हे प्रमुख कारण असल्याचे समजते. आरोपींवर खटला चालवण्यासाठी पुरेशी माहिती असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच भारतीय महिला आपल्या पतींबाबत अतिशय संवेदनशील असतात. आपल्या पतीने दुसर्या महिलेशी लग्न केले आहे किंवा आपल्या पतीचे दुसर्या महिलेसोबत संबंध आहे, हे कोणत्याही महिलेसाठी धक्कादायक असेल, असेही न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.