भारताचा स्टार गोलंदाज दीपक चहर अडकला लग्नबंधनात!
![भारताचा स्टार गोलंदाज दीपक चहर अडकला लग्नबंधनात! Deepak Chahar 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Deepak-Chahar-1-780x470.jpg)
मुंबई– Deepak Chahar got married | भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) बुधवारी आपली प्रेयसी जया भारद्वाजसोबत (Jaya Bhardwaj) लग्नगाठ बांधली. आग्रा येथील ‘जेपी पॅलेस’ (JP Palace) या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. दीपक आणि जयाच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
बुधवारी पार पडलेल्या या लग्न सोहळ्यासाठी दीपक आणि जयाचे कुटुंबिय व जवळचे नातेवाईक उपस्थित होते. दिल्लीची रहिवासी असलेली जया भारद्वाज एका कॉर्पोरेट कंपनीशी संबंधित आहेत. जयाने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. इन्स्टाग्रामवर जया स्वत:ला ‘डायनॅमिक उद्योजक’ आणि ‘नॉन-टेक्निकल टेकी’ असे म्हटलेले आहे.
दीपक चहरच्या लग्नामध्ये त्याचा चुलत भाऊ आणि डावखुरा गोलंदाज राहुल चाहर व बहीण मालती चहरने बहारदार नृत्य केले. राहुल चहर आणि मालतीचेही फोटोही प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नाच्या पाहुण्यांसाठी हातरस येथील रबडी, आग्रा येथील चाट, अवधी, मुघलाई, दक्षिण भारतीय, इटालियन आणि थाई खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.