पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

जीएसटीविरोधात तीव्र आंदोलन

पुणे : महाराष्ट्र प्रदेश आणि पुणे नॅशनल स्टुडंन्टस युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया (NSUI)च्या वतीने पुण्याच्या जीएसटी ऑफिसला गब्बर सिंग टॅक्सचे बॅनर लावून निषेध व्यक्त करण्यात आला. मोदी सरकारने वाढवलेल्या प्रचंड महागाईच्या विरोधात निषेध केला. सामान्य माणूस वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त आहे. त्यात मोदी सरकारने खाद्यपदार्थ जसे की दही, दूध, ताक, तूप, औषध वस्तूंवर जीएसटी लावून सर्वसामान्यांचे जीवन मुश्किल केले आहे.

लोकांच्या मनातील प्रचंड रोष विद्यार्थी काँग्रेसने जीएसटी कार्यालयासमोर व्यक्त केला. विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, उपाध्यक्ष उमेश खंदारे, पुणे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष भूषण रानभरे, सो. मि. प्रदेशाध्यक्ष अभिजात हळदेकर, सरचिटणीस संकेत गलांडे, सातारा जिल्हा अध्यक्ष रोहित झानझुरणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये