क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

आयपीएल लिलावात विदेशी खेळाडूंचा बोलबाला! सॅम करनला घेण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक बोली…

कोची : (IPL Auction 2022) जगातील सर्वात प्रसिद्ध लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी कोची येथील लिलावात रेकॉर्डब्रेक बोली लागल्याचं दिसून आलं. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Karan) याला तब्बल 18.50 कोटींना पंजाब किंग्सने विकत घेत रेकॉर्ड ब्रेक केला. याशिवाय कॅमरॉन ग्रीन (Camron Green) आणि बेन स्टोक्स यांनाही तगडी किंमत मिळाली आहे.

ग्रीनला 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) तर बेन स्टोक्सला (Best Stock) 16.25 कोटींना सीएसकेनं विकत घेतलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Cris Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते. पण यंदा त्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. निकोलस पूरनलाही 16 कोटींना लखनौ सुपरजायंट्सने विकत घेतलं आहे.

टी20 विश्वचषक 2022 चा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ ठरलेला इंग्लंडचा सॅम करन याच्यावर यंदा अनेक फ्रँचायझीची नजर होती. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या गोलंदाजांना मोठी मागणी असते. यासोबत तो खालच्या ऑर्डरमध्येही चांगली फलंदाजी करू शकतो. हेच कारण होते की बरेच संघ त्याच्यावर बराच पैसा ओतणार. तसंच झालं आणि त्याचा जुना संघ चैन्नई आणि पंजाब यांच्यात त्याला विकत घेण्यासाठी चुरशीची लढाई झाली जी पंजाब किंग्जने जिंकत 18.50 कोटींना सॅमला संघात घेतलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये