इस्रायलमध्ये मणिपूर घटनेची पुनरावृत्ती! विवस्त्र महिलेची काढली धिंड

Israel Palestine Conflict : पहाटेच्यावेळी कोणतीही चाहूल लागू न देता पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेच्या हमास (Hamas) दहशतवाद्यांनी हजारो रॉकेट आणि शेकडो हल्लेखोरांसह गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या (Israel Palestine Conflict) शहरांवर केलेल्या हल्ल्याने शनिवारी आखातात युद्धाचा भडका उडाला. इस्रायली शहरांमध्ये घुसखोरी करत दहशतवाद्यांनी जवान आणि नागरिकांचे करून त्यांना ओलिस मध्ये ठेवले आहे. एका महिलेला बेदम मारहाण करुन तिची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर, या महिलेल्या विवस्त्र मृतदेहावर ते जल्लोष करताना दिसत आहेत.
बेदम मारहाण करुन महिलेची विवस्त्र धिंड
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये हमास दहशतवादी एका छोट्या टेम्पोमध्ये बसल्याचं दिसत आहे. टेम्पोमध्ये मागच्या बाजूला एका महिलेला विवस्त्र मृतदेह दिसत आहे. या व्हिडीओमधून लक्षात येत की, या महिलेला बेदम मारहाण करण्यात आली असून तिचे हात-पाय तोडण्यात आलं आहेत. हमास दहशतवाद्यांनी महिलेले बेदम मारहाण करुन विवस्त्र धिंड काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.