Top 5देश - विदेश

उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर!

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर पाठोपाठ होत असलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या (Vice President) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने त्यांचे ज्येष्ठ नेते जगदीप धनखड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते सध्या पश्चिम बंगालचे (West Bengal) राज्यपाल असून भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. वर्ष 1989 ते वर्ष 1991 पर्यंत ते लोकसभा सदस्य होते तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकीलीही केली आहे.

आज दिल्लीमध्ये (Dehli) भाजपच्या (BJP) संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय (Amit Shah) मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) भारतीय जनता पक्षाचे सचिव बीएल संतोष आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून जगदीप धनगर (Jagdeep Dhangar) यांची उमेदवारी जाहीर केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये