देश - विदेश

Video : “चॅनल शिव ठाकरेला हरवण्यासाठी प्रयत्न करतंय…” बिग बॉसच्या माजी स्पर्धकाचा गंभीर आरोप

मुंबई | बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या फिनालय साठी अगदी काहीच दिवस शिल्लक आहेत. बिग बॉस 16 ची ट्रॉफी मिळवण्यासाठी स्पर्धकांची रस्सीखेच सुरु आहे. सर्वच स्पर्धक ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. ‘बिग बॉस 16’ हिंदीचा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी (१२ फेब्रुवारी) रंगणार आहे. यंदा बिग बॉस हिंदीच्या पर्वाचा विजेता कोण ठरणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे बिग बॉसचे निर्मात्यांवर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बॉस 16 चा विजेता कोण होणार? याबद्दल चर्चा सुरु आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात सहभागी झालेल्या मराठमोळ्या शिव ठाकरेला (Shiv Thakare) चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे शिव ठाकरे हा बिग बॉसचा विजेता होऊ शकतो असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे बिग बॉसची विजेती प्रियांका चौधरी होणार असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच यावरुन बिग बॉसच्या एका माजी सदस्याने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने बिग बॉसच्या निर्मात्यांवर धक्कादायक आरोपही केले.

प्रसिद्ध अभिनेता जय भानुशाली याला नुकतंच बिग बॉस 16 या कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याला तुझ्यामते बिग बॉस १६ चा विजेता कोण होणार, असे विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना जयने निर्माते आणि दिग्दर्शकांना टोला लगावला आहे.

https://www.instagram.com/reel/CoUkx7jjX3v/?utm_source=ig_web_copy_link

बिग बॉस 16 चा विजेता कोण असू शकतो? असे त्याला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, यापैकी कलर्स वाहिनीचं कोण आहे ? त्यावर रिपोर्टर म्हणाला प्रियंका…ते ऐकल्यावर जय म्हणाला, मग आधी ती जिंकेल. त्यानंतर जर काही झालंच तर शिवला बिग बॉस जिंकण्याची संधी मिळू शकते, असे जयने म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये