शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला निमंत्रण आल्यास जाणार का? जयंत पाटीलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

मुंबई : (Jayant Patil On Uddhav Thackeray) शिवसेनेच्या 56 वर्षेच्या इतिहासात शिवाजी पार्क येथिल दसरा मेळाव्याला राज्यभरातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र, या दसऱ्या मेळाव्याला एकनाथ शिंदेच्या बंडखोरीचे ग्रहण लागलं आणि या परंपरेला खंड पडतो की, काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या मेळाव्यावरून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांत चढाओढ सुरू आहे. या वादावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला 56 वर्षेची परंपरा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत. तसंच शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या नेत्यांना दसरा मेळाव्याचे आमंत्रण दिलं तर जाणार का? या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे. इतर पक्षाच्या नेत्यांनी निमंत्रण दिले जात नाही. तो त्यांच्या पक्षाचा मेळावा असतो. त्यांनी याआधी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण दिलेले आहे, असे माझ्या ऐकण्यात नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.