ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बागेश्वर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “…मोजून माराव्या पैजारा”

मुंबई : (Jitendra Awhad On Dhirendra Maharaj Shastri) मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धीरेंद्र महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धीरेंद्र महाराज शास्त्री यांच्यावर प्रचंड टीकेची झोट उठली असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

तर आव्हाडांनी या महाराजांना “जोड्याने मारल पाहिजे याला. असं ट्विट केले आहे. आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “या असल्या नकलाकार बाबांनी आमच्या महापुरुषांच्या बाबतीत तोडलेले अकलेचे तारे बघितल्यावर तुकोबारायांच्या शब्दातच सांगायचं म्हटल तर.

“तुका म्‍हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा” ही उक्ती योग्यच वाटते. अन व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटल तर,”जोड्याने मारल पाहिजे याला..!”यावरच समाधान होत. हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान या वादावर रोहित पवार यांनी ही संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे.

“महाराष्ट्रातील संत तुकाराम महाराज यांना त्यांच्या पत्नी रोज काठीने मारत असत. यावेळी त्यांना कोणीतरी विचारले तुम्हाला पत्नी मारते, तुम्हाला काहीच वाटत नाही का. तर तुकाराम महाराज म्हणाले, देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. पत्नीच्या चक्करमध्ये पडलो असतो. पण मारणारी पत्नी मिळाली तर मला संधी मिळाली देवावर प्रेम करण्याची,” असे वादग्रस्त विधान बागेश्वर महाराजांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये