“…म्हणून शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये”; राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य चर्चेत!
!["...म्हणून शरद पवारांनी राष्ट्रपती होऊ नये"; राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य चर्चेत! Sharad Pawar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Sharad-Pawar-780x470.jpg)
मुंबई – Jitendra Awhad on Sharad Pawar | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देशभर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. मात्र अशातच राष्ट्रवादीचेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, असं म्हटलं आहे.
विरोधी पक्षातील सक्षम चेहरा म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जात आहे. पण विरोधी पक्षांना खरंच तसं वाटत असेल तर पवार यांना राष्ट्रपती करण्यापेक्षा त्यांना UPA चे प्रमुख नेते म्हणून जाहीर करावं आणि येणाऱ्या 2024 ची रणनीतीची तयारी त्यांनी सुरु करावी, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जर ते राष्ट्रपती झाले तर त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा सन्मान होईल पण मात्र शरद पवार जोपर्यंत लोकांमध्ये मिसळत नाही तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत नाही. म्हणून मला असं वाटतं की, त्यांनी लोकांमध्येच रहावं, असं आव्हाड म्हणाले आहेत.