ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“औरंगजेबजीच्या कबरीवर…”, जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला चंद्रशेखर बावनकुळेंचा ‘तो’ फोटो

मुंबई | Jitendra Awhad – विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका केली जात आहे. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणी देखील सत्ताधाऱ्यांनी केली आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानामुळे सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंजेबजी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो ट्विट करून चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) दिसत आहेत. हा फोटो शेअर करत आव्हाडांनी ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’ असं खोचक ट्विट केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले होते?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला होता. “जितेंद्र आव्हाड स्टंटबाज माणूस आहे, नौटंकी आहे, त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात नौटंकी असते. ते औरंगजेबजी यांना क्रूर मानत नाहीत,” असं हिंदीमधून बोलताना बावनकुळेंनी ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये