न्या. उदय लळीत यांची ४९वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती; न्या. एन व्ही रमण्णा लवकरच निवृत्त

नवी दिल्ली : भारताचे ४८वे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा येत्या २६ ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी देशाचे ४९वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उदय उमेश लळीत पदभार स्वीकारणार आहेत. त्याबाबत कायदा मंत्रालयाने एक परिपत्रक जरी केलं आहे.
कायद्याप्रमाणे राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून निवड केली आहे. २७ ऑगस्ट पासून ते पदभार स्वीकारणार आहेत. अशी माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे.
न्यायमूर्ती उदय उमेश लळीत हे देवगड तालुक्याचे आहेत. १९८३ पासून त्यांनी वकिलीला सुरुवात केली आहे. अनेकवर्षे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र वकिली केली आहे. त्यांच्या घरातील अनेक मंडळी वकिली करतात. त्यांच्या आजोबांपासून त्यांचे वडील त्यांचे सर्व काका सर्वजण वकिली करतात.