ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

‘… आणि माझ्या मनात पाल चुकचुकली’; कैलास पाटलांनी सांगितला शिंदे गटासोबतच्या त्या रात्रीचा थरार

मुंबई Ekanath Shinde | मंगळवारी सकाळपासून महाराष्ट्राबाहेर जाऊन बसलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर आमदार यांनी परत यावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडून आवाहन केले जात आहे मात्र शिंदे गटाकडून महाविकास आघाडी मधून शिवसेनेने बाहेर पडावे अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान शिंदे गटातील आमदारांना जबरदस्तीने महाराष्ट्राबाहेर नेण्यात आल्याचीही चर्चा होत आहे. याची पुष्टी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे. त्यांना कसे जबरदस्तीने गुजरातला नेण्यात आल्याचे सांगितले आहे.

आम्हाला ठाण्यात महापौरांच्या बंगल्यांवर नेण्यात आले. तेथून पुढे आपल्याला पुढे साहेबांकडे जायचं आहे असं सांगण्यात आलं. आमच्यासोबत स्टाफ देखील होता. आम्हाला दुसर्‍या गाडीत बसण्यात आलं आणि वसई विरार च्या पुढे निघालो. आणि माझ्या मानत पाल चुकचुकली. काहीतरी चुकीचं घडतंय हे माझ्या लक्षात आलं. अशाप्रकारे सुरु झालेला प्रवास गुजरात पर्यंत पोहोचल्याचा आणि तेथून पळून येण्या पर्यंतचा प्रवास पाटील यांनी सांगितला.

गुजरात बॉर्डरवर चेकपोस्ट लागले होते. तेथून शिंदे यांच्या स्टाफने चालत पुढे जायला सांगितले आणि मी तेथून निसटलो. अंधारात मुंबईकडे चालत निघालो. एका बाईक वाल्याने मला पुढे सोडले. पुढे एका ट्रक मध्ये बसुन मी दहिसर पर्यंत पोहोचलो. त्यानंतर मी मुख्यमंत्री साहेबांशी संपर्क साधला त्यांनी मला घ्यायला गाडी पाठवली. अशा थरारक प्रवास पाटील यांनी सांगितला आहे. त्यावर राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलं आहे.

मात्र शिंदे गटाकडून कैलास पाटील हे खोटं बोलत असल्याच सांगण्यात येत आहे. पाटील यांना परत जाण्यासाठी आम्ही गाडी दिली होती असं सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये