“देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी…”, तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर करीनाचं स्पष्टीकरण

मुंबई | Kareena Kapoor Pregnant – बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सुट्ट्यांचे काही फोटो करीनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करीनाचा बेबी बंप दिसत असल्यानं ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र करीनानं नुकतंच यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिनं ती पुन्हा गरोदर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. “मी गरोदर नाही. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे आणि सैफच्या मते त्याने आधीच देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी योगदान दिलं आहे,” असं करीनानं म्हटलं आहे. करीनाच्या या स्पष्टीकरणानंतर तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सुरु असलेल्या अफवा खोट्या असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, करीना कपूर ही सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या व्हेकेशनला तिची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रीण अमृता अरोरादेखील पाहायला मिळत आहेत. या दोघींनीही सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. ज्यात सर्वजण व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत.
