28 वर्षांनी कसब्यात भाजपला दणका! महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी
पुणे : गेल्या महिन्याभरापासून प्रचंड चर्चेत राहिलेल्या कसबा (Kasba Bypoll Election) आणि पिंपरी-चिंचवड (Chinchwad Byelection) या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल सुरू आहे.
कसबा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर 11040 मतांनी विजयी झाले आहेत (In Kasba Bypoll Election Ravindra Dhangekar Congress win By 11040 votes). गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेला हा मतदारसंघ आता मविआने ताब्यात घेतला आहे. भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे.
“मला उमेदवारी मिळाली, त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला होता. प्रचार वगैरे औपचारिकता मला करावी लागली. मी सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून काम केलं आहे. मी कधीच आलेल्या माणसाचं नाव, त्याचा पत्ता विचारलेला नाही. माझा १५ हजार मतांनी विजय होईल.” असा विश्वास धंगेकर यांनी निकालापूर्वी व्यक्त केला होता.