Top 5आरोग्यताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्र

पुणेकर चाखणार काश्मिरी पदार्थांची चव! काश्मिरी खाद्यपदार्थांचा महोत्सव

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे : खाद्य म्हटलं की पुणेकर कायम पुढे असतात ….जर काश्मिरचे पदार्थ जर पुण्यात खायला मिळाले तर…. आणि तेही काश्मिरी वातावरणात ! हो अगदी बर्फाच्छादित हिम शिखरे आणि चिनार वृक्षांच्या प्रतिबिंबातच …. ! काय सांगता… हो.. हे खरे आहे.

शिवाजी नगर येथे युईआय ग्लोबल एज्युकेशन पुणे तर्फे भव्य काश्मिरी खाद्य पदार्थ महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये शाकाहारी आणि मांसांहारी पदार्थांचा समावेश होणार आहे.

उद्या १७ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १.३० UEI ग्लोबल एज्युकेशन, पुणे येथे आमच्या काश्मिरी फूड फेस्टिव्हल – हिंद-ए-वाझवान – काश्मीरचा स्वाद पुणेकर चाखणार आहे. संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना उद्योग मानकांनुसार मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या फूड फेस्टिव्हलमध्ये नामवंत शेफ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यामध्ये हे सर्व पदार्थ कॉलेजच विद्यार्थी-विद्यार्थींनी बनविणार आहेत. या मांसाहारी पर्दांमध्ये शामी कबाब, फिश टिक्का, अॅपल चटणी, मटन रोगनगोश, काश्मिरी चिकन कोरमा, खिमा राइस आदींसह विविध काश्मिरी पदार्थ चाखता येणार, शिवाय काश्मीरचा प्रसिद्ध व दुर्मिळ चहा ‘कहावा’चा घोटही घेता येणार आहे. तर शाकाहारीमध्ये शाकाहारी खवय्यांसाठी खास ड्राय फ्रूट रायता, केसर पुलाव,दाल बुखरा, गोग्जी राजम, केसर अँड ड्राय फ्रूट फिरणीसह टोमॅटोपासून तयार केलेले ‘शोरबा’या सूपचा आस्वाद घेता येणार आहे. कृत्रिम काश्मिरी वातावरण, नृत्यांची रेलचेल इन्स्टिट्यूट परिसराला कृत्रिम काश्मिरी गावाप्रमाणे नटवण्यात येणार आहे. शिवाय हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी काश्मिरी हिंदू आणि मुस्लिम लिबासात खवय्यांचे स्वागत करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये