महाविकास आघाडीच्या महामोर्चात पैसे वाटप? व्हिडीओ आला समोर

मुंबई : (Keshav Upadhye On Mahavikas Aghadi Mahamorcha, Mumbai) महाराष्ट्राच्या आदर्शांचा अपमान (Chhatrapati Shivaji Maharaj, dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule) , महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद (Karnataka Maharashtra Border dispute) आणि आणि सरकारची शांत भूमिका याविरोधात आज महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा (Mahavikas Aghadi Mahamorcha Mumbai) काढण्यात आला होता. यात सर्व विरोधी आणि मित्र पक्ष सहभागी झालेले होते. दरम्यान, सगळ्याच नेत्यांनी (Sharad Pawar, Ajit Pawar, Uddhav Thackerey) सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. मात्र, हे सगळं झाल्यानंतर या मोर्चाबाबाद सरकारमधील नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या गेल्या. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामोर्चात खूपच कमी लोक आहे होते, तो महामोर्चा नाही तर नॅनोमोर्चा होता. आणि मोर्चा अयशस्वी झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Keshav Upadhye On Mahamorcha, Devedndra Fadanvis)
दरम्यान, या सगळ्या घडामोडींत भाजपच्या केशव उपाध्ये यांनी एक व्हिडीओच शेअर केला आहे.ज्यात त्यांनी महा मोर्चात पैसे देऊन लोकांना आणले असल्याचा आरोप केला आहे. त्या व्हिडीओतील दृश्ये ही मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या कॅाग्रेस कार्यालयाजवळची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “आज मोर्चा सुरू असतानाचे दृश्य. आज मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीन.”असं त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.
One Comment