ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ थंडावली, शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन

नांदेड : (Keshavrao Dhondage Death) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मराठवाड्याची मुलुखमैदानी तोफ अशी ओळख असलेले केशवराव धोंडगे यांचे वृद्धापकाळाने निधन झाल. मृत्यू समयी ते १०२ वर्षांचे होते. धोंडगे यांच्यावर औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या नेता हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

केशवराव धोंडगे हे प्रदीर्घकाळ विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी विधानसभा तसेच लोकसभेतही जनतेचे प्रतिनिधीत्व केले आहे. केशवराव धोंडगे हे ५ वेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. तसेच एक वेळा ते लोकसभेची निवडणूकही जिंकले होते. सर्वसामान्य जनतेच्या समस्या ते सभागृहात पोटतिडकीने मांडत असत. विधानसभेत त्यांची अनेक भाषणे गाजली आहेत. ते निर्भिड आणि स्वाभिमानी बाण्याचे जनप्रतिनिधी होते. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आणि त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे.

जेष्ठ नेते केशवराव धोंडगे यांनी १९८५ साली गुराखीगडाची स्थापना केली होती. इतक्यावरच न थांबता त्यांनी जागतिक गुराखी साहित्य संमेलन आणि जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलनही भरवले होते. धोंडगे यांची लढवय्ये नेते अशीही ओळख होती. त्यांनी नवनवीन कल्पना राबवून विविध प्रकारचे सत्याग्रह केले. या सत्याग्रहांमध्ये पिंडदान सत्याग्रह, बोंबल्या सत्याग्रह, शेणचारू सत्याग्रह आणि खईस कुत्री सत्याग्रहांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या सत्याग्रहांची चर्चा राज्यभरात झाली. अशा या लढवय्या बाण्याच्या नेत्याने आज जगाचा निरोप घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये