इतरमनोरंजन

‘KGF 2’ चा ३०० कोटी क्लबमध्ये समावेश, बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ…

केजीएफ चित्रपटाच्या तुफान यशानंतर यशचा बहुप्रतीक्षीत केजीएफ २ शुक्रवारी बॉक्स ऑफीसवर दाखल झाला. यशचा हा चित्रपट भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सध्या धुमाकूळ घालत आहे. केजीएफ २ ने आत्तापर्यंत जगभरातून तब्बल ७५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.

विशेष म्हणजे हिंदी भाषेतही चित्रपटानं चांगली कमाई केली असून चित्रपटानं २९८ कोटींचा व्यवसायही केला आहे. अवघ्या १० दिवसात चित्रपटानं ७५० कोटींहून अधिकची कमाई केल्यानं केजीएफ २ आता नव्या विक्रमांनाdirecdtor prashanrt nieel गवसणी घालणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात रंगू लागली आहे.

कोरोना महामारीनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफ २ नं आपला विक्रम प्रस्थापीत केला आहे, असा दावाही चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी यावेळेस केला आहे. संजय दत्त अन् रविना टंडन सारखी तगडी स्टारकास्ट असल्यानं चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत असल्याचं चित्र सध्या पहायला मिळत आहे.

दरम्यान 300 कोटींच्या क्लबमध्ये आतापर्यंत ‘पीके’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘दंगल’, ‘टायगर जिंदा है’, ‘पद्मावत’, ‘संजू’, ‘वॉर’ या बॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे. आता लवकरच ‘केजीएफ 2’ देखील यात सामील होणार आहे.   

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये