“भाजपने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला” माघारीनंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया…
मुबंई : (Kishori Pedanekar On Chandrashekhar Bavankule)अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. भाजपने आडमुठेपणा केला अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. आजच पत्र का दिलं? एक महिनाआधी का दिलं नाही? हा संपूर्ण वाद टाळता आला असता. ऋतुजा लटके यांना मानसिक त्रास झाल तो कसा भरुन काढणार? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
तसेच, आमचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार याचा आनंद आहे. पण भाजपने काळजावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. लटकेंना ज्याप्रकारे राजीनामा देताना लटकवण्यात आलं होतं, ते लोक विसरु शकत नव्हते,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. समोर पराभव पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे असं ही त्या म्हणाल्या.