देश - विदेशरणधुमाळी

‘या’ कारणामुळं कुमार विश्वास यांच्या निशाण्यावर आले; भगवंत मान आणि केजरीवाल

चंदीगड : भारतीय जनता पक्षाचे नेते तजिंदरपाल सिंग बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. आपचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी बग्गा यांच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धडा देत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. कुमार विश्वास यांनी ट्विटरवर लिहिले की, प्रिय धाकटा भाऊ भगवंत मान, ३०० वर्षात पंजाबने दिल्लीच्या कोणत्याही असुरक्षित हुकूमशहाला आपल्या पराक्रमाशी खेळू दिले नाही. पंजाबने हा मुकुट तुमच्याकडे सोपवला आहे, कोणत्या बुटक्या दुर्योधनाच्या हाती नाही. पंजाबच्या लोकांच्या टॅक्सच्या पैशाचा आणि पोलिसांचा अपमान करू नका. पगडी संमभाल जट्टा!

दरम्यान, बग्गा यांच्या अटकेवरून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना धडा देत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करणे, शत्रुत्व वाढवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या आरोपाखाली पोलिसांनी बग्गा यांच्यावर ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. सीएम केजरीवाल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर बग्गा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये