ताज्या बातम्यामनोरंजन

“तुम्ही जगा, दुसऱ्यालाही जगुद्या…”; सोशल मीडियावर ट्रोल झाल्याने ललित मोदी संतप्त

मुंबई | Lalit Modi- Sushmita Sen Relationship – सध्या बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आणि माजी चेअरमन ललित मोदी चांगलेच चर्चेत आहेत. ललित मोदी यांनी सुष्मिता सोबत असलेल्या त्यांच्या नात्याची कबुली सोशल मीडियावर दिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी सोशल मीडियावर सुष्मिताबरोबच्या डेटिंगची एक पोस्ट केली आणि त्यावरुन वेगळ्याच चर्चेला तोंड फुटल्याचं दिसून आलं आहे. तसंच यावरुन ललित मोदी यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं असून ते या ट्रोलींगमुळे चांगलेच संतप्त झाले आहेत.

ललित मोदी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून मला मोठ्या प्रमाणावर भारतीय प्रसार माध्यमांनी ट्रोल केलं आहे. चुकीच्या पद्धतीनं मला ट्रोल केलं जात आहे हे मला सांगायचं आहे. मी इन्स्टावर दोन फोटो टॅग केले होते. दोन व्यक्ती हे काही मित्र होऊ शकत नाही का, आम्ही पूर्वी मित्र होतो. त्याच आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या पोस्टमधून मी केला आहे. त्यावरुन एवढ्या मोठ्या प्रमाणात गदारोळ होईल असं वाटलं नव्हतं. खरं तर आता या चर्चेवरुन मला संताप आला आहे.

ज्याप्रकारे माझ्या पोस्टचं वार्तांकन करण्यात आलं त्यावरुन मला खूप खेद वाटतो. स्वत: आनंदानं जगा आणि दुसऱ्यानं जगुद्या. असं मला भारतीय प्रसारमाध्यमांना सांगायचं आहे. नेमकी कोणत्या प्रकारची पत्रकारिता सुरु आहे असा प्रश्न मला यानिमित्तानं पडला आहे. यापूर्वी देखील माझ्या काही रिलेशनविषयीच्या बातम्या सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या. सध्या जे काही सुरु आहे त्या सगळ्या फेक न्यूज आहेत. मला ट्रोल केलं जात आहे. या गोष्टीचा राग आहे, असंही ललित मोदी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये