महाराष्ट्रमुंबई

लालापरीने दिला सर्वसामान्यांना झटका, एसटीची मोठी घोषणा

मुंबई : नुकतीच दिवाळीच्या सणाला सुरवत झाली आहे. सर्वत्र रोषणाई पाहायला मिळत आहे परंतु ऐन दिवाळीत बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वीच एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. पण दुसऱ्या बाजूला एसटी महामंडळाने भाडेवाढबाबत मोठी घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना ऐन दिवाळीत आर्थिक झळ सोसून प्रवास करावा लागणार आहे. महामंडळाने केलेली हंगामी भाडेवाढ ही प्रवाशांना परवडणारी नसून ही भाडेवाडी कमी करण्याची मागणी सर्व सामान्य नागरिकांनकडून केली जात आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आजपासून एसटी प्रवासामध्ये 5 रुपये तर 75 रुपयांची वाढकरण्यात आली आहे. तर ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर पर्यंत लागू असणार असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्येकवर्षी दिवाळीच्या काळात महसूल वाढीसाठी अशी भाडेवाढ लागू करण्यात येते. तर हि हंगामी भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. यामध्ये भाडेवाढ ही साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बससाठी लागू असणार आहे. तर इतर शिवनेरी आणि अश्वमेध या गाड्यांना ही भाडेवाड लागू होणारनाही असं देखील स्पष्ट सांगण्यात आलं.

दरम्यान, एसटी महामंडळाकडून असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे की, ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे, त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसचं मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. तसंच 1 नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील. तर आपण पुढे पाहू शकता झालेली भाडेवाढ. यामध्ये दादर ते स्वारगेट – साधी – सध्या 235 प्रस्तावित – 260, दादर ते स्वारगेट – शिवशाही सध्या 350 प्रस्तावित- 385, मुंबई ते कोल्हापूर – साधी गाडी सध्या – 565, प्रस्तावित – 625 , शिवशाही- सध्या 840, प्रस्तावित – 925, मुंबई ते नाशिक- साधी गाडी सध्या 400, प्रस्तावित 445, शिवशाही- 595, प्रस्तावित 655, मुंबई ते औरंगाबाद- साधी गाडी सध्या- 860 प्रस्तावित – 950, शिवशाही – सध्या 1280 प्रस्तावित – 1410 अशी करण्यात आली आहे. यामुळे प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये