Top 5ताज्या बातम्यादेश - विदेशमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

मुंबई – Aurangabad, Osmanabad, New Mumbai Airport : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Monsoon Session) आज शेवटचा दिवस असताना विधिमंडळात अनेक घडामोडी घडत आहेत. राज्य सरकारकडून विविध ठराव मंजूर केले जात आहेत. यातच मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्य सरकारच्या औरंगाबाद (Aurangabad), उस्मानाबाद (Osmanabad) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) विमानतळाच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे.

शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यांनतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याच्या अगोदर औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यांनतर एकनाथ शिंदे यानी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेला नामांतराचा निर्णय अवैध असल्याचं म्हणत फेटाळला आणि नव्याने नामांतराचा निर्णय घेतला. त्यातही राज्यातील काही पक्षांकडून आणि संघटनांकडून नामांतराच्या विषयावर आक्षेप घेतलेला आहे. त्यासंबंधित याचिका देखील न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे.

आज नामांतराच्या प्रस्तावाला पावसाळी अधिवेशानादरम्यान मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नामांतराच्या प्रक्रियेतील एक मोठा टप्पा पार पडला आहे. त्यानुसार औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यात येणार असून नवी मुबई विमानतळाला दि. बा. पाटील असं नाव देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये