क्रीडाताज्या बातम्यामनोरंजन

धोनीच्या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का? जाणून घ्या चित्रपटाबद्दल

मुंबई | भारतीय क्रिकेटमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे. धोनी सिनेमा जगतात देखील नशिब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीच्या ‘लेट्स गेट मॅरिड’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर आऊट झाला असून सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. धोनीचा हा पहिला चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘लेट्स गेट मॅरिड’ या चित्रपटाची कहाणी गौतम व मीरा या पात्रांभोवती फिरणारी आहे. गौतम व मीराचे एकमेकांवर खूप प्रेम असते. त्यामुळे दोघं लग्न करायचं ठरवतात, पण लग्नानंतर मीराला गौतमच्या आईबरोबर राहण्याची इच्छा नसते; त्यामुळे गौतम एक ट्रिप प्लॅन करतो. जेणेकरून त्याच्या आईचं आणि मीराचं नातं घट्ट होईल, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

महेंद्रसिंग धोनी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. एप्रिल 2023 मध्ये ‘एलएजीएम’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, तेव्हा धोनी म्हणाला होता की, हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद देईल. एलजीएम’एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे, जो सगळ्यांना आवडेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये