ताज्या बातम्या

आरोग्य आणि फॅशनची सांगड घालणारे पावसाळी ट्रेंडी फुटवेअर

मुंबई | जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाळी वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग सुरू होते. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच बाजारात रंगीबेरंगी छत्र्या आणि रेनकोट आपल्याला पाहायला मिळतात. पण पावसाळा म्हणजे केवळ छत्री आणि रेनकोट खरेदी करणे नाही. तर फुटवेअर खरेदी करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यात आपले पाय सतत ओले होतात. मग पायांच्या बोटांमधील बेचक्यामध्ये ओलावा राहिल्यास फंगल इन्फेक्शन, चिखली यासारखे आजार होतात. बऱ्याचदा पावसात भिजून आल्यानंतर पायात घातलेले शूज आपण तसेच ठेवतो आणि ते ओले राहात असल्याने अशा त्वचारोगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पाणी साचणार नाही अशा फुटवेअरचा वापर करणे गरजेचे आहे. या पावसाळ्यात तुम्ही आरोग्य सांभाळत आणि फॅशन जपत या फुटवेअरचा वापर करू शकता.

क्रॉक्स

image

पावसाळी चपला आणि बूट ट्रेंडी आणि आरामदायी असावेत असे आपल्याला वाटत असते. बाजारातही विविध रंगांचे, वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर मिळतात. मग त्यामध्ये रबरी, प्लॅस्टीक असे प्रकार उपलब्ध असतात. त्यातच असणारे सुटसुटीत आणि त्याचवेळी दिसायला चांगले असणारे आकर्षक रंगांमध्ये क्रॉक्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मुलांबरोबर मुलीदेखील याचा वापर करू शकतात.

व्हेजेस

image 1

जर तुम्हाला बारा महिने हिल्स वापरायची सवय असेल तर पावसाळ्यात व्हेजेस हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पेन्सिल हिल्स ऐवजी या व्हेजेसचा पर्याय चांगला ठरू शकतो. रेट्रो लूकमध्ये सध्या अनेक व्हेजेस बाजारात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फ्लॉरल प्रिंटेड व्हेजेस हे ट्रेंडिंग आहेत.

गम बुट्स

image 18

गम बुट्स म्हणजे पावसाळ्यातील सर्वात प्रसिद्ध पर्याय. हे बुट्स रबरचे असल्याने आणि आकाराला मोठे असल्याने पावसाच्या पाण्यापासून तुमचा बचाव करतात. या बुटांमध्ये आता अनेक रंगसंगती उपलब्ध आहेत. पण पावसाळ्यात गडद रंगाचा वापर करावा. सध्या बाजारात पारदर्शक शूज देखील मिळतात.

ट्रान्सपरंट चप्पल्स

image 2

सध्या बाजारात ट्रान्सपरंट चप्पल्सचा ट्रेंड आहे. या चप्पलवर फ्लोरल प्रिंट, अॅनिमल प्रिंट, पोल्का डॉट्स प्रिंट देखील पाहायला मिळते. या हटके चपला तुम्ही फक्त ऑफिसमध्ये किंवा घरात घालू शकता. यामुळे तुम्हाला वाताचा त्रास होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये