लोकसभेत आणि विधानसभेत ‘या’ शब्दांना बंदी
नवी दिल्ली : अनेकवेळा विधानसभेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांत शाब्दिक वाद होताना दिसतात. त्यात अनेकवेळा चुकीचे शब्दप्रयोग वापरलेले असतात. जे ‘असंसदीय’ मानले जातात. अशा अनेक शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे संसदेतील उमेदवारांना अशुध्ह शब्द वापरण्याला लगाम बसणार आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भीतीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विरोधी पक्षाकडून म्हटलं जात आहे. संसदीय अभिव्यक्ती नियमांतर्गत अशा शब्दांची यादी अगोदरपासून आहे. मात्र, आता यात नवीन शब्दांची भर घालण्यात आली आहे. ‘असंसदीय’ शब्दांचा नियम लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधानपरिषदांना लागू होतात.
नवीन भर घातलेले शब्द
संसदेत काही इंग्रजी आणि हिंदी शब्दांची ‘असंसदीय’ शब्दांच्या यादीत भर घातली आहे. त्यातील शब्द – जुमालाजीवी, बाल बुद्धी सांसद, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाळ चाकडी, गुल खीलये, पिट्टू, कमिना, काला सत्र, दलाल, खून की खेती, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पिते सांड, बॉब कट हेअर, गरीयाना, उच्चके, उलटा चोर कोतवाल को डांटे, काव काव करना, तलवे चाटना, तुर्रम खां, कई घाट का पानी पीना, ठेंगा दिखाना, आय विल कर्स यु, ब्लडशेड, चीटेड, शेडिंग क्रोकोडाइल टीअर्स, माफिया, रबिश, स्नेक चार्मर, ट्रेटर,शर्मिंदा, विश्वासघात, भ्रष्ट, पाखंड, अक्षम.
वरील नवीन शब्दांचा असंसदीय शब्दांच्या यादीत भर घातल्यान्नातर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर टीका केली जात आहे.