ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा; अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई : (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Government) राज्यातील शेतकरी संकटात असताना दुसरीकडे सरकार स्वत:चे हसरे चेहरे दाखवण्यासाठी करोडोंचा चुराडा करत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Session) सरकारला विविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आज, विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार घालत असल्याची घोषणा त्यांनी केली. विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राज्यपाल बैस यांची भेट घेणार आहे

सोमवारपासून, राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी आज, विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरत असताना लोकांनी आपली कैफियत मांडली. शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. शेतकरी आत्महत्येत वाढ होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले.

वाढत्या महागाईमुळे शेती उत्पादन खर्च वाढला आहे. पण त्या तुलनेत शेतमालाला भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूरमधील शेतकऱ्याला कांदा विक्री केल्यानंतर अवघ्या दोन रुपयांचा चेक मिळाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यांला चांगला भाव सरकारने जाहीर करून निर्यात वाढवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आपला कांदा परदेशात गेला पाहिजे आणि सरकारला

जाहिरातींवर 50 कोटी सरकारने खर्च केले आणि मुंबई महापालिकेने 17 कोटी रुपये सरकारने जाहिरातींवर खर्च केले आहेत. आपले हसरे चेहरे दाखवण्यासाठी ही उधळपट्टी सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नाही आणि दुसरीकडे महामंडळाच्या पानभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे. हा प्रकार चिड आणणारा असल्याचे पवार यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये