चीनच्या नामांकित कंपनीचे भारतीयांपुढे लोटांगण
![चीनच्या नामांकित कंपनीचे भारतीयांपुढे लोटांगण tesla and nitin gadkari](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/tesla-and-nitin-gadkari.jpg)
नवी दिल्ली : टेस्लाने भारतात कारखाने सुरू करणे, विक्रीसाठी कार तयार करणे आणि निर्यात करणे हे स्वागतार्ह आहे. पण टेस्लाने चीनमधून कार आयात करू नये, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी सांगितले. मेक इन चायना आणि भारतात विक्री हा चांगला प्रस्ताव नाही. यामुळे टेस्ला ही चीनची नामांकित कंपनी भारतीयांपुढे लोटांगण घेताना दिसत आहे. टेस्ला कंपनी त्यांची कार भारतात आयात करून विकण्यास उत्सुक आहे. यासाठी टेस्लाने आयात शुल्कात कपात करण्यासाठी जवळपास वर्षभर दिल्लीतील अधिकाऱ्यांशी लॉबिंग केले होते. तर, दुसरीकडे भारतातील दर जगातील सर्वाधिक असल्याचे विधान एलोन मस्क यांनी यापूर्वीच केले आहे.
तसेच टेस्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया च्या अनुषंगाने भारतात उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी भारतातील त्यांच्या गुंतवणूक योजनेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मस्क यांना भारत सरकारने टेस्लाच्या कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र, मस्क यांच्या या मागणीला भारत सरकार तयार नसून, मस्क यांच्या दबावाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.