आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याच्या विचारांनीच यश मिळाले – ना. माधुरी मिसाळ

पुणे : जेव्हा संकट येते तेव्हा लोकं असा विचार करतात की अरे देवाने हे काय माझ्या नशिबात दिले, पण देव आपल्या साठी जे चांगलं करतो ते आपण लक्षात ठेवत नाही. मी मात्र आलेल्या संकटाला तोंड कसं द्यायचं याचा विचार करत गेल्याने आणि त्या त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे गेल्याने मला यश मिळाले असे ना. माधुरीताई मिसाळ (Madhuritai Misal) म्हणाल्या. क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने कौटुंबिक सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांचा सत्कार त्यांच्या शाळेतील ९ वर्षांच्या पद्मा लाहोटी यांच्या हस्ते पुणेरी पगडी, शाल व शतपैलू सावरकर हे पुस्तक देऊन करण्यात करण्यात आला. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन (Creative Foundation)चे अध्यक्ष संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), प्रसिद्ध यु ट्यूबर सुशील कुलकर्णी, मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, उद्यम बँकेचे अध्यक्ष दिनेश गांधी, संचालक राजाभाऊ पाटील, राजन परदेशीं, दिनेश भिलारे, कर्वे समाज सेवा संस्थेचे गव्हर्निंग कौन्सील चे अध्यक्ष विनायक कराळे,सचिव श्री शिवकुमार भाजप कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मा. नगरसेवक दीपक पोटे, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, शाम देशपांडे,आरपीआय चे अध्यक्ष वसंतराव ओव्हाळ, बाळासाहेब खंकाळ, क्रीडा आघाडीचे प्रतीक खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त कल्याणी खर्डेकर, सतीश कोंढाळकर, देवेंद्र भाटिया, विनायक काटकर, राजेंद्र गादिया यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.