ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा प्रश्न सभागृहात ऐरणीवर, सरकार घेणार लग्नाची जबाबदारी? फडणवीसांनी घेतली गुगली

मुंबई | Maharashtra Assembly Session – विधानसभेत नेहमी आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू असतं. अशातच आज (21 मार्च) सभागृहाच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. याचं कारण म्हणजे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं लग्न. आदित्य ठाकरे यांच्या लग्नाची चर्चा आज चक्क विधानसभेत रंगली. तसंच या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आदित्य ठाकरेंची चांगलीच गुगली घेतली. त्यावर आदित्य ठाकरेंनीही मिश्किल प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

सुरूवातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आपला मुद्दा मांडला. ते म्हणाले की, “कामगार आहे म्हणून लग्न केलं पण आता लग्न तुटलं तर त्याला कोण जबाबदार आहे? याची सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे. याच्यासाठी काही धोरण आखणार आहात का?”, असा सवाल बच्चू कडूंनी उपस्थित केला.

बच्चू कडूंच्या या विधानावर देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, “लग्न जोडण्याची जबाबदारी सरकारची, लग्न तुटल्यानंतर त्याला सांभाळायची जबाबदारीही सरकारचीच. पण जी आपण सूचना केली आहे ती जरुर तपासून पाहता येईल. तसंच त्यावर काही धोरण तयार करता येईल का ते पाहता येईल.”

पुढे फडणवीस म्हणाले, “बच्चू कडूंनी हा प्रश्न आदित्यजींकडे पाहुन विचारला होता का? सरकारनं लग्न लावायचं..त्यावर आदित्य ठाकरे आपल्या जागेवरुनचं म्हणाले, “नको नको” मग फडणीस पुन्हा मिश्किलपणे म्हणाले, “सरकार लग्नाची जबाबदारी घ्यायला तयार आहे.” त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, “ही राजकीय धमकी आहे का? की तुम्ही आमच्यासोबत बसा अन्यथा तुमचं लग्न लावून देऊ” आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये