महाराष्ट्र

‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचा’ मान सातारकराच्या जोडीनं पटकावला!

कर्जत- Maharashtra Kesari Bulldog Race | आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्राच्या विविध भागातील बैलगाडी शर्यत प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत सहभाग नोंदवला. गुरुवारी कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर या भव्य राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार बघायला मिळाला. काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या स्पर्धेत अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीच्या अंतिम स्पर्धेत एकूण 7 पारितोषिके देण्यात आली. त्यापैकी प्रथम क्रमांक सचिन चव्हाण यांनी पटकावला आहे. तसेच द्वितीय क्रमांक माळशिरसच्या तांबोळी यांच्या राणा ग्रूप यांनी पटकावला आहे. त्याचबरोबर तृतीय क्रमांक पटकावण्याचा मान किशोर भिलारे यांना मिळाला आहे. प्रथम क्रमांक आलेल्यांना 2 लाख 22 हजार 222 रुपये तर द्वितीय आलेल्यांना 1 लाख 11 हजार 111 तर तृतीय क्रमांक आलेल्यांना 77 हजार 777 रुपये व सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील विद्यमान राज्यमंत्री अदिती ताई तटकरे आणि राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील आमदार देखील उपस्थित होते. त्यामध्ये आ. अशोक बापू पवार, आ.अनिल पाटील, आ. संग्राम भैय्या जगताप, आ.आशुतोष काळे, आ.निलेश लंके, आ. राजू नवघरे, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले , आ. संजय मामा शिंदे, आ. दिलीप काका बनकर, आ. यशवंत माने, आ. इंद्रनील नाईक , आ.अतुल बेनके, आ. ऋतुराज पाटील, आ. झीशान सिद्दिकी, आ.राहुल जगताप यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये