ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सुप्रिम कोर्टाकडून फक्त ‘तारीख पे तारीख’? राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर!

नवी मुंबई : (Maharashtra Politics Hearing Postponed Again) एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडखोरीमुळे शिवसेना नेमकी कोणाची? असा प्रश्न मागील 5 महीन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव (Ghivsena) आणि धनुष्यबाण चिन्हं गोठवलं. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वेगळी नावे आणि चिन्हे दिली. त्यानंतर ठाकरे गटकडून शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रत ठरवण्यासंबधी याचिका दाखल केली होती.

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी दाखल याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार होती.

दरम्यान सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायमूर्ती कृष्ण मुरारी (Justice Krush Murari) सुट्टीवर असल्यामुळे आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. न्यायालयाकडून प्रत्येकवेळी फक्त तारीख पे तारीख दिली जात आहे. यामुळे सामान्य जनतेचा न्यायालयावर कितपत विश्वास बसेल हा पण एक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ही सुनावणी आता कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.

मागील पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना आपली बाजू लिखित स्वरुपात मांडण्यास सांगितलं होतं. यासाठी दोन्ही पक्षकारांना न्यायालयाकडुन तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही सुनावणी वारंवार लांबणीवर पडल्यामुळे निकाल कधी येणार आणि शिवसेना नेमकी कोणाची हे स्पष्ट होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये