Top 5ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

हिवाळी अधिवेशनात ‘हे’ मुद्दे मांडणार विरोधी पक्ष

नागपूर : (Winter Session Maharashtra nagpur, Ajit Pawar) उद्या नागपुरात होणाऱ्या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष सरकारला जाब विचारणार यावर आज महाविकास आघाडीकडून नागपुरात पत्रकार परिषद (Mahavikas Aghadi press on Winter Session Nagpur) घेण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून नागपूरमध्ये राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. 29 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. (Mahavikas Aghadi On winter session nagpur letest marahti news maharashtra nagpur marahti news)

या मुद्द्यांवर होणार चर्चा

  • महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महापुरूषांचा अवमान केला जातोय. हे वारंवार घडतंय.
  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असतांना सरकार यावर मदत कताना निष्क्रिय दिसत आहे.
  • महाराष्ट्राती प्रकल्प राज्याबाहेर पळवण्यात आले आहेत. ज्यामुळे राज्यातील लाखो तरुणांचा रोजगार हिरावला. राज्य सरकारने केंद्रासमोर याबाबत मांडलं पाहिजे.
  • तीन आठवड्यांचं अधिवेशन घ्या. म्हणून आमची मागणी.
  • मागासवर्गीय मुलामुलींचे, आदिवासी, अल्पसंख्यांक आणि ओबीसी मुलामुलींना मिळणारी कोट्यावधींची रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही.
  • कर्नाटक सीमाप्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहे. पण सध्याचं सरकार आल्यावर तो सुटण्याऐवजी तो अधिक चिघळला. उलट महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करू लागले.अशी हिंमत याआधी कुणाची झाली नव्हती पण आता हे सगळं घडतंय. आमचा विकास होणार नसेल तर आम्ही इतर राज्यात जाऊ अशी भूमिका काही गावं घेऊ लागली.
  • सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली पाहिजे.

वरील विषयांवर तसेच इतरही अनेक प्रश्नांवर चर्चा करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये