आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीने जिंकली सर्वांची मनं, एकच कृती अन् व्हिडिओ व्हायरल
![आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीने जिंकली सर्वांची मनं, एकच कृती अन् व्हिडिओ व्हायरल Dhoni](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Dhoni--780x470.jpg)
चेन्नई : (Mahendra Singh Dhoni Viral Video) महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत खेळताना बऱ्याचदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण आता तर आयपीएल सुरु झाली नाही, पण आयपीएल सुरु होण्यापूर्वीच धोनीने सर्वांची मनं जिंकली आहेत. धोनीचा एक व्हिडिओ सध्याच्या घडीला जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे.
आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनी हा चेन्नईत दाखल झाला आहे. चेन्नईत धोनी हा चांगलाच घाम गाळत आहे आणि सराव करत आहे. धोनीचे सरावाचे व्हिडिओ सर्वच पाहत असतील. पण धोनीचा हा व्हिडिओ मात्र खास आहे. हा व्हिडिओ सराव करतानाचा नाही, तसेच नेट्समधला देखील नाही. हा व्हिडिओ चेपॉकच्या स्टेडियममधला आहे. धोनीन यावेळी अशी एक कृती केली आहे की, त्याने सर्वांचीच मनं यावेळी जिंकली आहेत.
आपल्या संघावर किती प्रेम असावं, हे धोनीकडून शिकायला हवं. कारण आपलं स्टेडियम चागलं दिसावं, यासाठी धोनीने एक पाऊल उचलले आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेपॉक स्टेडियमच्या खुर्च्या पिवळ्या रंगाने रंगवल्या जात आहेत. आपणही त्यामध्ये सहभाग घ्यावा आणि संघासाठी हे एक काम करावे, असे धोनीला वाटले. त्यामुळे धोनीने स्प्रे हातात घेतला आणि त्याने खुर्च्या रंगवल्याचे पाहायला मिळाले. धोनीचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे आणि तो व्हायरल झाला आहे.