ताज्या बातम्यापुणेसिटी अपडेट्स

दहीहंडीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, पुणेकरांनो ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर

पुणे | Pune News – आज (7 सप्टेंबर) संपूर्ण राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. तर पुण्यात (Pune) देखील दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दहीहंडी पाहण्यासाठी पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. लाखोंच्या संख्येनं लोक दहीहंडी पाहण्यासाठी येत असता. या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

दहीहंडीनिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. यामध्ये लक्ष्मी रोड, टिळक रोड, बाजीराव रोड या परिसरातील वाहतूक संध्याकाळी 5 ते दहीहंडी संपेपर्यंत वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहनं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केलं आहे.

पुण्यातील पीएमपीएल मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सिंहगड आणि शनिवारवाडा या मार्गाचा बस रस्ता बंद झाल्यानंतर या बस स्वारगेटवरून जाणार आहेत. तर सांगवी मार्गाचा बस रस्ता बंद झाल्यानंतर त्या बस मनपा भवन स्थानकावरून जाणार आहेत. तर बस मार्ग क्र. 8, 9, 57, 94, 108, 143 या मार्गाचा बस रस्ता बंद झाल्यानंतर या बसेस मनपा भवन, डेक्कन जिमखाना, गाडीतळ या मार्गाने जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये