विसर्जनानिमित्त शहरातील ‘हे’ रस्ते वाहतुकीसाठी राहणार बंद; जाणून घ्या वाहतूक मार्गांतील बदल

पुणे | Pune News – गणपती विसर्जनासाठी (Ganesh Visarjan) अवघे काही तासच शिल्लक राहीले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. उद्या (28 सप्टेंबर) सकाळपासून ते शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत शहरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात आले असून काही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
गणपती विसर्जन मिरवणूकीच्या कालावधीत दोन दिवस सर्व प्रकारच्या जड वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे.
शहरातील वाहतुकीसाठी बंद असेलेल रस्ते
1. लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौकी ते टिळक चौक
2. टिळक रस्ता – टिळक चौक ते जेधे चौक
3. शिवाजी रस्ता – जेधे चौक ते काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन
4. बगाडे रस्ता – फडके हौद चौक ते सौन्या मारूती चौक
5. केळकर रस्ता – टिळक चौक ते बुधवार चौक
6. बाजीराव रस्ता – फुटका बुरूज चौक ते बजाज पुतळा चौक
7. शास्त्री रस्ता – टिळक चौक ते सेनादत्त चौकी
8. गणेश रस्ता – जिजामाता चौक ते दारूवाला पूल
9. कुमठेकर रस्ता – टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
10. कर्वे रस्ता – नळ स्टॉप ते खंडोजीबाब चौक
11. जंगली महाराज रस्ता – खंडोजीबाबा चौक ते झाशी राणी चौक
13. फर्ग्युसन रस्ता – फर्ग्युसन महाविद्यालय चे खंडोजीबाबा चौक
14. भांडारकर रस्ता – गुडलक चौक ते पीवायसी जिमखाना
15. प्रभात रस्ता – शेलारमामा चौक ते डेक्कन पोलीस ठाणे
वरील बंद असलेल्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग म्हणून या रिंगरोडचा वापर करावा
कर्वे रस्ता- नळस्टॉप चौक- लॉ कॉलेज रस्ता- सेनापती बापट रस्ता- सेनापती बापट रस्ता जंक्शन – गणेशखिंड रस्ता- सिमला ऑफिस चौक- संचेती हॉस्पिटल चौक- इंजिनिअरिंग कॉलेज चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील शाहीर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक- नरपतगीर चौक- नेहरू रस्त्यावरून संत कबीर पोलिस चौकी- सेव्हन लव्हज चौक- वखार महामंडळ चौक- शिवनेरी रस्त्यावरून गुलटेकडी मार्केटयार्ड- मार्केटयार्ड जंक्शन- सातारा रस्त्याने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमागृह)- सिंहगड रस्त्याने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक- सिंहगड रस्ता जंक्शन- लाल बहादूर शास्त्री रस्त्याने सेनादल पोलिस चौकी- अनंत कान्हेरे पथावरून म्हात्रे पूल ते नळ स्टॉप.