२०२४ मध्ये ममता बॅनर्जी होणार पंतप्रधान… तृणमूल खासदाराचे ट्विट
कोलकत्ता : २०२४ सालच्या लोकसभा निवडणुका आणखी जवळपास दोन वर्षे लांब आसतानाच, आता मात्र जोर वाढताना पाहायला मिळत आहे. मागिल अनेक दिवसापासून ऐरणीवर असलेल्या प्रश्नाचे उत्तर आज मिळले आहे. त्याचे कारण म्हणजे तृणमूल काॅंग्रेसच्या खासदाराचे एक ट्विट समोर आले आहे. २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधक कोण असा प्रश्न समोर असतानाच आता पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याचं नाव चर्चेत आलं आहे. टीएमसी खासदार अपरूपा पोद्दार यांनी त्यांच्या ट्विटचं स्पष्टीकरण दिलं आहे.
त्यामुळं मोदींसमोर ममता बॅनर्जी आव्हान उभं करणार की काय? याची उत्सुकता लागून राहिलीय. खासदार पोद्दार यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, २०२४ मध्ये ममता बॅनर्जी राष्ट्रपतींकडून पंतप्रधान म्हणून शपथ घेतील, तर अभिषेक बॅनर्जी बंगालचे मुख्यमंत्री होतील. असं त्यांनी नमूद केलं होतं. परंतु, हे ट्विट केल्यानंतर काही वेळातच पोद्दार यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं आहे. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.