ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

जीव देईन, पण देशाचे तुकडे कधीच होऊ देणार नाही; मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

कोलकाता : (Mamta Banerjee On Narendra Modi) रमजान ईद (Ramadan Eid) कार्यक्रमात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वप्रथम सर्व मुस्लीम बांधवांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकाला शांततेनं जगण्याचा संदेश दिला.

जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की शांतेत राहा आणि कोणाचंही ऐकू नका. देशात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षाकडून प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे तुम्ही सर्वधर्मिय लोकांनी एकत्र आनंदात राहिलं पाहिजे.

पुढे बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मला देशद्रोही पक्ष आणि एजन्सीशी लढावं लागेल. मी त्यांच्याशी लढत राहीन आणि त्यांच्यापुढं कधीच झुकणार नाही, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्ष भाजपला इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप-तृणमुल काँग्रेस यांच्यातील वाद चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये