ताज्या बातम्यामनोरंजन

अभिनेता मनोज वाजपेयीवर दु:खाचा डोंगर, आईचं छत्र हरपलं

मुंबई | Manoj Bajpayee’s Mother Passes Away – बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीवर (Manoj Bajpayee) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मनोज वाजपेयीच्या आई गीता देवी (Geeta Devi) यांचं निधन झालं आहे. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. तसंच, आज (8 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली.

मागील काही दिवसांपासून गीता देवी यांची प्रकृती खराब होती. त्यामुळे दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. तसंच तब्येतील सुधारणा झाल्यानं त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आलं. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, गेल्याच वर्षी मनोज वाजपेयी याच्या वडिलांचं निधन झालं होतं. आता त्याच्या आईचंही निधन झाल्यानं वाजपेयीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मनोजनं सिनेसृष्टीमध्ये आजवर अनेक नावीन्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तसंच त्याला पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानं त्याच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्याचा चाहतावर्गही लाखोंच्या संख्येत आहे. ‘सत्या’ मधला भिकु म्हात्रे ते फॅमिली मॅन अशा त्याच्या सगळ्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये