सलाईन काढले, पाणीही सोडले; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यास नकार
![सलाईन काढले, पाणीही सोडले; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, वैद्यकीय उपचार घेण्यास नकार manoj jarange](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/09/manoj-jarange--780x470.jpg)
जालना | Manoj Jarange Patil – गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Protest) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आहे, तर आता मनोज जरांगेंची प्रकृती खालावत चालली आहे. तसंच त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
मनोज जरांगेंनी रविवारपासून पाणी घेण्याचं सोडलं आहे. तसंच त्यांनी सलाईन लावून घेण्यासही नकार दिला आहे. त्याचबरोबर जरांगेंनी पल्स, ब्लड शुगर आणि पाणी पातळी तपासण्यास देखील नकार दिला आहे. तर त्यांची तब्येत खालावली असून त्यांना अशक्तपणा आला आहे.
दरम्यान, मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत राज्य सरकारनं ठोस आश्वासन दिलं नसल्यामुळे त्यांनी त्यांचं उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच जरांगेंनी कालपासून पाणी आणि औषध घेणं बंद केलं आहे. त्यांनी सलाईन देखील काढून टाकली आहे.