पुणेसिटी अपडेट्स

सोनम वांगचुक यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ सहभागी

पंढरपूर ः पंढरपूरमध्ये ५ व्या राष्ट्रीय शिक्षक संमेलनास जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त व विविध प्रशासकीय अधिकारी सहभागी होऊ100 न मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती एटीएमप्रमुख विक्रम अडसूळ व प्रशांत वाघमारे यांनी दिली. स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र यांचे राष्ट्रीय शिक्षक संमेलन १४ व १५ मे रोजी होणार असून त्याचे उद्घाटन एससीआरटीचे संचालक मा. एम. देवेंदरसिंह (IAS), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीपजी स्वामी, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी सुलभा वठारे, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, शिक्षण अभ्यासक प्राची साठे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे करणार आहेत.

Sonam Wangchuk Inside Quote 4 1
सोनम वांगचुक

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक बदलती शिक्षणपद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार असून निर्णयाची नवपरिभाषा या पुस्तकाचे प्रकाशन करणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० : शालेय शिक्षणातील आव्हाने या विषयावर शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंतराव काळपांडे (मा. शिक्षण संचालक), एटीएमप्रमुख विक्रम अडसूळ, शिक्षणतज्ज्ञ नदीम खान, राष्ट्रपती पारितोषिकविजेते संदीप पवार बोलणार आहेत. दिल्ली येथील गव्हर्न्मेंट मेंटॉर टीचर मनुगुलाटी जॉय फुल क्लासरूमबद्दल तर राष्ट्रीय अविष्कारा अभियानाबद्दल अभ्यासक नदीम खान बोलणार आहेत. मॉडेल स्कूल व शैक्षणिक आव्हानांबद्दल चर्चा होणार आहे. शिक्षण संचालक दिनकरजी टेमकर यांची प्रकट मुलाखत व रात्री कवीकट्टा होणार आहे. १५ मे रोजी एज्युकेशन अ‍ॅपबद्दल अ‍ॅपगुरु इम्रानखान, केरळ येथील शिक्षणतज्ज्ञ विधू नायर यांचे मार्गदर्शन, तसेच शैक्षणिक संशोधन व शिक्षकाची भूमिका या विषयावर एससीआरटीचे उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे, डॉ. प्रभाकर क्षीरसागर, डॉ. गीतांजली बोरुड मार्गदर्शन करणार आहेत.

सन्मान सोहळा शिक्षण संचालक दिनकर टेमकर व एससीआरटीचे उपसंचालक डॉ. कमलादेवी औटी यांच्या हस्ते होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनात सहभागी होणार्‍यांसाठी निवास व भोजनव्यवस्था असून ऑनलाईन प्रवेश नोंदणी अनिवार्य आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, एटीएमप्रमुख विक्रम अडसूळ, ज्योती बेलवले, नारायण मंगलम, प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर विजागत, अश्विनी तावसकर, सारिका फासे, अमरजा काळे, अर्चना कोळी, गिरीजा नाईकनवरे, सुरवसे, चव्हाण, सोलापूर व महाराष्ट्र कृतिशील शिक्षक सदस्य प्रयत्न करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये