मराठी अभिनेते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

मुंबई | मराठी अभिनेते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात झाला आहे. ते कर्जतला जात असताना ही दुर्घटना घडली आहे. मंगेश देसाई कुटुंबासोबत कर्जतला जात असताना वाशी येथील कोकण भवन परिसरात त्यांच्या कारचा अपघात झाला आहे. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र वाहनाचं नुकसान झालं आहे.
या घटनेसंदर्भात मंगेश म्हणाले, मला आणि कुटुंबाला कोणतीही दुखापत झालेली नाही. यात वाहनाचं नुकसान झालं आहे. छोटासा अपघात झाला असून काळजी करण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मंगेश देसाई यांनी ‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी एक आठवण शेअर केली. वागळे इस्टेटमध्ये एका कार्यक्रमाला भेटलो होतो. तुम्ही आमदार होता. तुम्हाला पहिल्यांदाच भेटलो, तुम्हाला बघून घाबरलो होतो. पण तुम्ही खूप छान बोलला होता, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहीलं होतं.