‘मराठवाडा विदर्भातील-विदर्भासंदर्भात अजित पवारांनी राज्यपालांकडे केल्या ‘या’ २१ मागण्या

मुंबई : मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना तत्काळ मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासंबंधित २१ मागण्या असलेले पत्र त्यांनी राज्यपालांना दिले आहे.
मराठवाड्यातील आणि विदर्भातील अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील माती अक्षरशः खरडून वाहून गेली आहे. शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. असे निरीक्षण नोंदवल्याचे अजित पवारांनी सांगितले.
त्या भागातील अनेक शेतकरी पुरामुळे मृत्युमुखी पडले आहेत. त्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केलेली आहे मात्र, शेकडो शेतकऱ्यांची जनावरे देखील पुरात वाहून गेलेली आहेत. त्यासंबंधित राज्य सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी देखील अजित पवारांनी केली आहे.
अजित पवार यांनी राज्यपालांकडे २१ मागण्यांचे पत्र दिले आहे.