Instagram वर मैत्री, प्रेमाची कबुली आणि नंतर अल्पवयीन मुलीसोबत भयानक कृत्य

सातारा | देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. दरम्यान सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर अल्पवयीन मुलीची एका मुलासोबत मैत्री झाली. दरम्यान यांच्या मैत्रीचे नात्यात रुपांतर झाले कालांतराने त्या मुलाने सातवीतील मुलीवर 15 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिकत आहे. सप्टेंबर 2022 दरम्यान या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर भेटीगाठी सुरू झाल्या. मग नंतर प्रेम जडले. एक दिवस बाहेर फिरायला गेल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. पुढे वेळोवेळी अत्याचार झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुलीला पोटदुखी होवू लागली. अखेर पालकांनी मुलीला दवाखान्यात नेल्यानंतर ती 4 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती समोर आली.
त्यावरुन मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेतील पिडीत मुलीवर उपचार सुरु आहेत. संशयित मुलगा व मुलगी हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे.